‘व्हॉट्सअॅप’वर लवकरच व्हिडिओ कॉलिंग

December 24, 2015 10:15 AM0 commentsViews:

whatsapp calling24 डिसेंबर : व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेंजर अॅपवर लवकरच व्हिडिओ कॉलिंग सुविधा मिळणार आहे. या पूर्वी “व्हॉट्स अॅपने आपल्या यूजर्ससाठी व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जगभरात ती लोकप्रियही ठरलीय.

सध्या अॅप मार्केटमध्ये इतर व्हिडिओ सुविधा पुरविणार्‍या संकेतस्थळाची तीव्र स्पर्धा असतानाही व्हॉट्स अॅप व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरू करणार आहे. व्हॉईस कॉलिंगप्रमाणेच व्हिडिओ कॉलिंगचे डिझाईन असणार आहे. एकाच वेळी अनेकांशी व्हिडिओ कॉलिंग, कॉलदरम्यान मोबाईलचा कॅमेरा फिरविण्याची तसंच माईक बंद करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close