रेल्वेचा दणका, तत्काळ तिकीटात 25 ते 100 रुपये वाढ

December 24, 2015 11:43 AM0 commentsViews:

BL01_P1_RAILWAY_1472880f24 डिसेंबर : रेल्वे प्रशासनाने तोट्याचा भार कमी करण्यासाठी प्रवाशांच्या खिश्यावर चांगलाच डल्ला मारलाय. तत्काळ आरक्षण तिकीट दरात 25 ते 100 रुपयांची घसघशीत वाढ केलीये. 25 डिसेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

स्लीपर क्लाससाठी आता तत्काळ तिकीटात कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 200 वाढ केली आहे. आधी हे चार्ज क्रमश : 90 ते 175 रुपये होते. यासोबत एसी चेअर कारमध्ये तत्काळ चार्ज कमाल 125 रुपये आणि किमान 225 रुपये असणार आहे. आधी हेच चार्च 100 ते 200 रुपये होते. तर थ्री टायर एसीमध्ये तत्काळ चार्ज कमीत कमी 300 रुपये आणि जास्तीत जास्त 400 रुपये असणार आहे. आधी हेच चार्ज 250 ते 350 होते. तर एसी टू टायर आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये कमीत कमी 400 रुपये तर जास्तीत जास्त 500 रुपये चार्ज असणार आहे. आधी हेच चार्ज 300 रुपये ते 400 रुपये होते. मात्र, सेकंड क्लासने प्रवास करणार्‍या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला असून या दरवाढीतून सूट देण्यात आलीये. सेकंड क्लासमध्ये कोणतीही वाढ केली नाही.

अशी होणार तत्काळ दरवाढ
                                                  नवे दर            आधीचे दर
स्लीपर क्लास –                      100 ते 200          90 ते 175
एसी चेअरकार –                      125 ते 225         100 ते 200
थ्री टायर एसी –                       300 ते 400       250 ते 350
एसी टू टायर –                         400 ते 500       300 ते 400
एक्झिक्युटिव्ह क्लास –            400 ते 500       300 ते 400

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close