पुण्यात पुन्हा गँगवारचा भडका, राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाची हत्या

December 24, 2015 12:27 PM0 commentsViews:

mirge24 डिसेंबर :  पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात गँगवारचा पुन्हा भडका उडाला आहे. भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विजय मिरगे यांचा बुधवारी रात्री खून करण्यात आलाय.

मिरगे यांच्यावर त्यांच्या माताळवाडी इथल्या राहत्या घराजवळ हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close