माझं निलंबन का ?, पंतप्रधानांनीच आता हस्तक्षेप करावा -आझाद

December 24, 2015 12:34 PM0 commentsViews:

azad pc24 डिसेंबर : डीसीए घोटाळा प्रकरणी भाजपने आपल्यावर केलेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे. जे बोललो ते खरं बोललो त्याची ही शिक्षा का ?, या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा असी मागणी कीर्ती आझाद यांनी केली. ते अहमदाबादमध्ये बोलत होते.

आझाद यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाने पाठवलेली निलंबनाची नोटीस मिळाली त्याला आपण उत्तर देणार आहोत असंही किर्ती आझाद यांनी म्हटलंय. गेल्या 9 वर्षांपासून आपण डीसीएच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय, मी पक्षाविरूद्ध कुठलही काम केलेलं नाही तसंच काँग्रेससोबतही पडद्यामागे डील केली नाही असंही आझाद यांनी म्हटलंय. पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली. तसंच आता मी माघार घेणार नाही. डीडीसीएच्या कार्यालयावर छापा का नाही टाकला जातेय, असा सवाल त्यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close