भाजप उभारणार महागाईविरोधी आंदोलन

February 19, 2010 11:28 AM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारीमहागाईच्या मुद्यावर भाजप आता देशव्यापी आंदोलन उभारणार आहे. येत्या 21 एप्रिलला देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी दिला आहे. भाजपचे सध्या इंदूर इथे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजपने हा निर्णय घेतला आहे. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार असल्याच आरोप भाजपने केला आहे. आमच्या सरकारच्या काळात चार नैसर्गिक आपत्ती आल्या. पण त्याची झळ आम्ही सामान्य जनतेला लागू दिली नव्हती, असा दावाही यावेळी करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून इंदूरमध्ये भाजपचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे

close