कल्याणमधील शाळेत सिलिंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू

December 24, 2015 6:57 PM0 commentsViews:

Kalyan adfj

24 डिसेंबर : कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेत गुरूवारी झालेल्या स्फोटात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण पूर्व येथील मलंग परिसरात ही शाळा आहे.

आज शाळेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी फुगे फुगविण्यासाठी नायट्रोजन सिलेंडर गॅस मागविण्यात आलेला होता. फुगे फुगविताना अचानक या सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट झाला तेव्हा सिलेंडरच्या आजुबाजूला उभी असणारी आठ ते दहा मुले स्फोटात जखमी झाली. जखमींना कल्याण आणि डोंबिवलीतील एपीईएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या स्फोटात गंभीर झालेल्या फुगे फुगवणाऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close