राज्यातल्या 191 सिंचन प्रकल्पांची चौकशी करा, न्यायालयाचे सरकारला आदेश

December 24, 2015 7:44 PM0 commentsViews:

ujani dam sol

24 डिसेंबर : राज्यातील 2007 ते 2013 मध्ये मंजूरी देण्यात आलेल्या 191 सिंचन प्रकल्पांची चौकशी करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जलतज्ञ प्रदिप पुरंदरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

तत्कालिन सरकारनं 2007 ते 2013 मध्ये 191 प्रकल्पांना मंजूरी दिली होती. सुमारे 5600 कोटी रुपयांचे हे प्रकल्प मंजूर करताना महाराष्ट्र जलसंपदा नियमन कायद्याचं उल्लंघन करण्यात आल आगे. त्याच बरोबर अनेक प्रकल्पात अनियमिता दिसून आली आहे. अनेक ठिकाणी काम सुरू होण्यापुर्वीच बीलं अदा करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करावी असं न्यायमुर्ती एआयएस चिमा आणि न्यायमुर्ती आर.एम बोरडे यांनी राज्यसरकारला दिले आहेत. या प्रकल्पांमध्ये विदर्भातील 148 , मराठवाड्यातील 29 तर उर्वरित महाराष्ट्रतील 3 प्रकल्पांचा समावेश आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close