महापालिका कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा

February 19, 2010 11:37 AM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारीसहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे या मागणीसाठी मुंबई महापालिकेतल्या कर्मचार्‍यांनी 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यानंतर बीएमसी कमिशनर स्वाधीन क्षत्रिय यांनी सर्व कामगार संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. उद्या दुपारी महापालिका मुख्यालयात ही बैठक होणार आहे. बैठकीत तोडगा निघाल्यास कामगार संघटना आपला संप मागे घेऊ शकतील. सुधारीत वेतनापोटी कर्मचार्‍यांना दीड महिन्यात 300 कोटी रुपयांची थकबाकी मिळावी, अशी मागणी सर्व कामगार संघटनांनी केली आहे.सहावा वेतन आयोग लागू झाल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कर्मचार्‍यांना जुन्या श्रेणीनुसार पगार मिळत आहेत. त्यामुळे पगारात वाढ केली नाही तर काम बंद करू, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

close