पंतप्रधान मोदींच्या हस्ते अफगाणिस्तानच्या संसदेचं उद्घाटन

December 25, 2015 12:52 PM0 commentsViews:

modi in cabul25 डिसेंबर : रशियाचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) सकाळी काबुलमध्ये पोहोचले. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी मोदींचं शाही स्वागत केलं. गनी यांच्या राष्ट्रपती महलात शाही स्वागत संभारभानंतर मोदींच्या हस्ते अफगाणिस्तानच्या संसदेचं उद्घाटन करण्यात आलं.

भारतानं 800 कोटी रुपये खर्च करून अफगाणिस्तानला ही इमारत बांधून दिला आहे. या कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. आपण काबुलमध्ये पोहचलो असून खुश आहोत अशी प्रतिक्रिया मोदींनी यावेळी दिली. पंतप्रधान मोदी, अशरफ गनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुला अब्दुला आणि पूर्व राष्ट्रपती हमीद करजाई यांची भेट घेणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close