आश्रमात मुलांवर अत्याचार

February 19, 2010 12:54 PM0 commentsViews: 8

19 फेब्रुवारीबदलापूर येथील कृष्णकुंज आश्रमात 6 ते 7 मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे.हा प्रकार या मुलांनी पळून येऊन घरी सांगितला. तेव्हा हे प्रकरण उघड झाले. हा शिक्षक या मुलांना मारहाणही करत होता. आता यापैकी दोन मुलांवर कळवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. बदलापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आश्रमाचा संचालक राजू मलैया डेव्हीड याला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी किर्ती कुमार फरार झाला आहे.गरीब आणि गरजू मुलांवर झालेल्या अत्याचारामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. या आश्रमाचा संचालक राजू मलैया डेव्हिड येथील मुलांच्या असहायतेचा गैरफायदा घेत असल्याचा त्याच्यावर आरोप होत आहे.

close