शेतकर्‍यांसाठी शिव्याही खाईन…

February 19, 2010 2:04 PM0 commentsViews: 4

19 फेब्रुवारीशेतकर्‍यांना रास्त दर मिळत असेल तर मी शिव्याही खायलाही तयार आहे, असे कृषीमंत्री शरद पवार म्हणाले आहेत. सध्या मीडियामध्ये महागाईमंत्री म्हणून माझी संभावना केली जात आहे. पण माझ्या निर्णयांमुळे शेतकरी खूष आहेत. उत्तर प्रदेशात शेतकर्‍यांनी काही दिवसांपूर्वी गव्हाला 500 रुपये भाव मिळत होता. आम्ही गेल्या वर्षी अकराशे रुपये क्विंटल भाव दिला. त्यामुळे शेतकरी दुचाकी, चारचाकी घेऊ लागले आहेत. सोलापुरातील माळशिरस, करमाळा, माढा या दुष्काळी तालुक्यांमध्येही 55 हजार दुचाक्यांची खरेदी झाली आहे. याचाच अर्थ शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारत आहे. जगातील 17 टक्के लोकसंख्या आणि 3 टक्के पाणी भारतात आहे. एवढ्या लोकसंख्येला येथील बळीराजा जगवतो. त्यामुळे त्याच्या सुविधेचा विचार व्हायलाच हवा. याबाबत अर्थतज्ज्ञ असणारे पंतप्रधानही माझ्या विचारांशी सहमत आहेत. असेही पवार म्हणाले आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

close