सलग सुट्‌ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेची वाहतूक संथ

December 25, 2015 8:56 PM0 commentsViews:

pune-highway

25 डिसेंबर : सलग चार दिवसांच्या सुट्‌ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनासाठी बाहेर पडलेल्यांचा वाहतूक कोंडीने हिरमोड झाली होती. मात्र आता हे ट्रॅफीक काही प्रमाणात सुरळीत झालं असून लोणावळा- खंडाळा घाटात सध्या ट्रॅफीक संथ गतीनं सुरू आहे.

मुंबईहून निघाल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाशी टोल नाका, खालापूर टोलनाका, लोणावळ्याचा घाट आणि तळेगाव टोलनाका इथे सकाळपासूनच कोंडी झाली होती. प्रत्येक टोलनाक्यावर जवळपास अर्धा ते एक किलोमीटरच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पर्यटनासाठी मुंबईबाहेर जाणार्‍यांच्या आनंदावर विरजण पडलं होतं.

ईद, ख्रिसमस आणि शनिवार-रविवार या चार दिवसांच्या सुट्‌ट्यांमुळे अनेक मुंबईकर पर्यटन आणि पिकनिकसाठी निघाले होते, पण वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचा बेत पूर्णपणे फसला. लोणावळ्याकडे जाणार्‍या मार्गावर तब्बल 15 ते 20 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या तीन पदरी रांगा लागल्या आहेत. पंधरा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तब्बल अडीच ते तीन तास लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं, पण आता ही कोंडी काहीशी सुटली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close