मोदींचा मास्टरस्ट्रोक! वाढदिवसानिमित्तने घेतली नवाज शरीफांची भेट

December 25, 2015 8:06 PM0 commentsViews:

CXE29BjUAAAJPlb

25 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफ यांची भेट घेऊन मास्टरस्ट्रोक मारला आहे. अफगाणिस्तान दौर्‍यावरुन परतत असताना पंतप्रधान मोदींनी अचानक नवाज शरीफ यांची भेट घेण्यासाठी लाहोर गाठलं. नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळेच शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदींनी या अचानक पाकिस्तान दौर्‍याचे प्रयोजन केलं. मोदी-शरीफ भेट ही अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होती. कारण या भेटीबाबत कुठलीही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली नव्हती.

अफगाणिस्तान संसदेच्या उदघाटनचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरला गेलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने पाकिस्तानच्या धावत्या भेटीवर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाहोर विमानतळावर आगमन झाल्यानंतर शरीफ यांनी त्यांचं स्वागत केलं. मोदी विमानातून उतरल्यावर दोघांची गळाभेट झाली. त्यानंतर नवाज शरीफ आणि मोदी एकाच हेलिकॉप्टरने निवासस्थानाकडे रवाना झालं. नवाज शरीफ यांच्या घरी पोहोचल्यानंतर जवळपास तासभर त्यांच्यामध्ये चर्चा रंगली. मोदी यांच्या रुपानं तब्बल 11 वर्षांनी भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली आहे. एवढचं नाही तर लाहोर विमानतळावर नरेंद्र मोदी यांना सोडण्यासाठी स्वत: नवाज शरीफ उपस्थित राहिलं होतं.

पंतप्रधान विराजमान झाल्यानंतर मोदी या निमित्ताने पहिल्यांदाच पाकिस्तानला भेट देणार आहेत. यापूर्वी पाकिस्तानला भेट देणारे भारताचे शेवटचे पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी. आज वाजपेयी यांचा वाढदिवस आहे आणि नवाज शरीफ यांचाही आजच वाढदिवस आहे. हा अनोखा योगायोग साधून मोदी यांनी भारत-पाकिस्तान संबंधांना आणखी गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, मोदींच्या पाक भेटीबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं असून पंतप्रधान मोदी-नवाज शरीफ यांच्या भेटीवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. मोदींची पाकिस्तान भेट पूर्वनियोजित होती. त्यामुळे मोदींनी या भेटीबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शिवाय, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तान दौरा भारतासाठी हिताचा नाही, असेही काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले. तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शेजारी देशांशी चांगलं संबंध ठेवावेच लागतात, असं सांगून मोदींच्या निर्णयाचे समर्थन केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close