आझादसाठी आमिर खान बनला सांता !

December 25, 2015 3:47 PM0 commentsViews:

25 डिसेंबर : बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट म्हणून ओळखला जाणार आमिर खान चित्रपटात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावतो. अशीच एक सांताची भूमिका आमिर खानने निभावली आहे, पण ती चित्रपटात नव्हे तर त्याच्या खर्‍याखुर्‍या जीवनात. मुलगा आझाद आणि त्याच्या मित्रांसाठी आमिर खान सांता बनला होता.

आमिरच्या घरी दरवर्षी ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात येतं. यावेळी हे सेलिब्रेशन अधिक खास करण्यासाठी तो चक्क सांताचं बनला होता. सॅण्टाक्लॉजच्या कपड्यांमध्ये येऊन आमिरने मुलगा आझादसह त्याच्या मित्रमंडळींना भरपूर गिफ्ट्स देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. त्याच्या घरी झालेल्या या सेलिब्रेशनचे फोटो आमिरने फेसबुकवर टाकले आहेत. तसंच, त्याने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close