वाघाच्या हल्ल्यांनी गावकरी वैतागले

February 19, 2010 2:10 PM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारीचंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर आणि सिंदेवाही परिसरातील गावकरी वाघाच्या हल्ल्यांनी त्रस्त झाले आहेत. या वैतागलेल्या गावकर्‍यांनी शिवनीतील वन विभागाच्या कार्यालयाची आणि पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली आहे. गेल्या 15 दिवसांत वाघाच्या हल्ल्यात 5 जण ठार झाले आहेत. वन विभागाला या वाघाला अजूनही जेरबंद न करता आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने आता 6 शूटर्सची नियुक्ती केली आहे.

close