बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी रद्द

February 19, 2010 2:31 PM0 commentsViews: 11

19 फेब्रुवारीमहाराष्ट्र पोलिसांना आता किमान काही महिने बुलेटप्रुफ जॅकेटशिवायच काम करावे लागणार आहे. कारण राज्य सरकारने बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करण्याचे कंत्राट रद्द केले आहे. 'आयबीएन-लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार या कंत्राटामध्ये बर्‍याच त्रुटी होत्या. त्यामुळे हे कंत्राटट रद्द करण्यात आले आहे.निकष काटेकोर26/11च्या हल्यानंतर बुलेटप्रुफ जॅकेटवरून मोठा वाद झाला. सरकारवर टीका झाली. त्यानंतर राज्य सरकारनं मुंबई पोलिसांच्या रक्षणासाठी चांगल्या प्रतीची बुलेट प्रुफ जॅकेटसे खरेदी करण्याचे ठरवले. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या. यासाठी निकष एवढे काटेकोर होते की कोणतीही कंपनी त्याची पूर्तता करु शकली नाही. त्यामुळे संपूर्ण कंत्राटच रद्द करण्याची वेळ सरकारवर आली. चेंडू केंद्राच्या कोर्टातया संदर्भात आता आर. आर. पाटील यांनी चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. सध्या केंद्र सरकारलाही 59 हजार जॅकेटस् खरेदीचा प्रस्ताव क्वालिटी सॅम्पल न मिळाल्याने गुंडाळावा लागला आहे. आता केंद्र सरकार जोपर्यंत नव्याने निविदा मागवत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र पोलिसांना बुलेटप्रुफ जॅकेटशिवायच काम करावे लागणार आहे.

close