रिबेरो यांचा लढाईचा निर्धार

February 19, 2010 2:43 PM0 commentsViews: 4

19 फेब्रुवारीतोडफोड आणि मारहाणीच्या प्रकरणांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांना राज्य सरकारने क्लीन चिट दिली आहे. पण तरीसुद्धा या नेत्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार याचिकाकर्ते ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसनेदेखील राज्य सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.पत्राचे रुपांतर जनहित याचिकेत राजकीय पक्षांची आंदोलने आणि कार्यकर्त्यांच्या तोडफोडीमुळे सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान होते. त्या विरोधात निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांनी मुंबई हायकोर्टाला पत्र लिहिले होते. कोर्टाने या पत्राचे जनहित याचिकेत रुपांतर केले.पण या खटल्याच्या सुनावणीत राज्य सरकारने या तिघाही नेत्यांचा बचाव केला. आता या नेत्यांना हायकोर्टात खुलासा करायला भाग पाडले जात नाही, तोपर्यंत न्यायालयीन लढाई लढणारच, असा निर्धार ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचा घरचा आहेरदुसरीकडे राजकीय हिंसाचाराला प्रवृत्त करणार्‍या नेत्यांचा बचाव करणे योग्य नाही, म्हणत काँग्रेसने राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. हायकोर्टात तोंडघशी पडल्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांना आता जाग आली आहे. त्यांनी ज्युलिओ रिबेरो यांच्या खटल्यातील राजकीय नेत्यांच्या विरोधात कोणती कारवाई करता येऊ शकेल, याबाबत ऍडव्होकेट जनरलशी सल्लामसलत करण्याचे आदेश दिले आहेत.

close