डॉन निवृत्त होतोय, वारसदार कोण ?

December 26, 2015 1:24 PM0 commentsViews:

Dawood Ibrahim12326 डिसेंबर : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिम आज (शनिवारी) त्याच्या काळ्या धंद्यांमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 60 व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दाऊदचा वारसदार कोण, हेही आज कळण्याची शक्यता आहे. छोटा शकील की दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम.. कोण होतं दाऊदचा वारसदार, ह्याची घोषणा आज स्वतः दाऊद करेल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

अनीस हा दाऊदचा सख्खा भाऊ आहे, तर छोटा शकील हा गेली कित्येक वर्षं दाऊदचा उजवा हात आहे. दाऊदची तब्येत हल्ली ठीक नसते. त्यामुळे तो निवृत्त व्हायचा विचार करतोय. आज लाहोरजवळ दाऊदची बर्थडे पार्टी आहे, असं समजतंय आणि या समारंभात ही घोषणा होईल, असं सूत्रांकडून कळतंय.

आज डॉनची मोठी पार्टी

- पार्टीचं ठिकाण गुप्त ठेवण्यात आलं आहे
– लाहोरजवळ पार्टी होणार : सूत्र
– निमंत्रितांनाही ठिकाण कळवण्यात आलेलं नाही
– त्यांना हॉटेलमधून पिक अप करून थेट नेण्यात येणार
– दुबई आणि दक्षिण आफ्रिकेतून अनेक पाहुणे आल्याची माहिती

दाऊदचे काळे धंदे
– अंमली पदार्थ
– सट्टेबाजी
– हवाला
– शस्त्रांची तस्करी
– बांधकाम व्यवसाय
– एकूण 66 हजार कोटींचं दाऊदचं साम्राज्य आहे

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close