इसिसमध्ये सामिल होण्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये तिघांना अटक

December 26, 2015 1:38 PM0 commentsViews:

nagpur_arrest26 डिसेंबर : मुंबईत मालवणीमधील 3 तरुण इसिसमध्ये सहभागामुळे धुराळं उडाली होती. आज (शनिवारी) नागपूरमध्ये आणखी 3 तरुणांना अटक करण्यात आलीये. हे तिन्ही तरुण इसिसमध्ये सामिल होण्यासाठी नागपूर विमानतळावरुन मध्य आशियासाठी रवाना होणार होते. मात्र, वेळीच नागपूर एटीएसने या तिघांना ताब्यात घेतलं.

नागपूर विमानतळावर आज 3 तरुणांना अटक करण्यात आली. अब्दुल वसीम , 2 उमर हसन फारुखी , 3 माज हसन फारुख, अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही जण हैदराबादचे रहिवासी आहे. हे तिघंही आयसिसमध्ये भरती होण्यासाठी मध्य आशियामध्ये चालले होते, असा संशय आहे.

तेलंगणा एटीएसनं ही अटक करण्याची विनंती महाराष्ट्र एटीएसला केली होती. अतिशय गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. तिघे जण श्रीनगरहून नागपूरमार्गे मुंबईला जात होते, अशी माहिती मिळतेय. परंतु, हे तिघेही तरुण इसिसमध्ये भरती होणार होते की नाही याची माहिती अजून उघड झाली नाही. एटीएस अधिक चौकशी करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close