शूटिंगमध्ये गोल्ड मेडल

February 19, 2010 2:54 PM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारीकॉमनवेल्थ शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये गगन नारंग आणि पी टी रघुनाथ यांनी भारताला स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. 10 मीटर एअर रायफल प्रकारात गगनने 599 पॉइंट्स मिळवले. तर रघुनाथने 594 पॉइंट्स मिळवले. त्यामुळे 1193 स्कोअरसह भारतीय टीमने गोल्ड पटकावले. कॉमनवेल्थ स्पर्धेतला हा रेकॉर्ड आहे. इंग्लंडची टीम 1185 पॉइंट्सह दुसर्‍या क्रमांकावर राहिली. महिलांमध्येही अनिसा सय्यद आणि अनुराग सिंग यांनी पंचवीस मीटर एअर रायफल प्रकारात गोल्ड पटकावले.पहिल्या दिवशी भारतीय टीमने एकूण दोन गोल्ड आणि एक सिल्व्हर तसेच एक ब्राँझ मेडलची कमाई केली आहे.

close