योद्धाच !, शरद जोशींनी वाहनचालक ते शेतकर्‍यांना संपत्ती केली दान

December 26, 2015 2:05 PM0 commentsViews:

shard _joshi_326 डिसेंबर : आपलं संपूर्ण आयुष्य शेतकर्‍यांसाठी वेचलेले शरद जोशी यांचं नुकतंच निधन झालं. पण, त्यांच्यानंतरही त्यांचा आधार शेतकर्‍यांसोबत असणार आहे. कारण त्यांच्या स्वकष्टार्जित कमाईतला मोठा हिस्सा त्यांनी आपल्या या सहकार्‍यांना दान दिलाय. त्यांच्या इच्छापत्रात त्यांनी हे स्पष्ट केलंय.

या इच्छापत्रात शेतकर्‍यांचा, सहकार्‍यांचा, सेवेकर्‍यांचा आणि अगदी आपल्या वाहनचालकाचाही विचार केलाय आणि त्यांना काही लाखोंची रक्कम त्यांनी देऊ केली आहे. त्यांची शेती, कारखान्याचा हिस्सा, जमीन हे सगळं त्यांनी अर्पण केलंय. फक्त पुण्यातलं राहतं घर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावे केलंय.

पुणे जिल्ह्यातली आंबेठाणमधली शेती आणि अंगारमळा 21 एकर जमिनीपैकी 15 एकर जमीन गेल्यावर्षीच विकली होती. त्या पैशांचं वाटप करण्यात आलंय. त्यांचे सहकारी आणि शेतकरी संघटकचे संपादक प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांच्यासाठी 20 लाख रुपये देण्यात आले आहे. देखभाल करणारे अनंत देशपांडे यांच्यासाठी 20 लाख दिले आहे. त्यांचा वाहनचालक बबनराव गायकवाड यांच्या नावे 10 लाख रुपये दिले आहे. एवढंच नाहीतर हिंगणघाटच्या बुडीत शेतकरी सॉल्वंट कारखान्याच्या बागधारक शेतकर्‍यांसाठी 25 लाख रुपये आणि रावेरमधल्या सीता मंदिरासाठी 13 लाख देण्यात आले आहे. आपल्या संपत्तीची विल्हेवाट लावताना जोशी यांनी वारसदार मुली, सेवेकरी, तसंच संघटना आणि भागधारक शेतकरी या सर्वाचे स्मरण ठेवले, पण प्रामुख्याने बुडीत ठरलेल्या शेतकरी सॉल्वंट कारखान्याच्या भागधारक शेतकर्‍यांचे ऋण काही प्रमाणात चुकविण्याची त्यांची इच्छा संघटनाप्रेमींचे मन हेलावणारी ठरत आहे.

मृत्युनंतरही शेतकर्‍यांचा आधारवड

पुणे जिल्ह्यातली आंबेठाणमधली शेती आणि अंगारमळा
21 एकर जमिनीपैकी 15 एकर जमीन गेल्यावर्षीच विकली
त्या पैशांचं वाटप
त्यांचे सहकारी आणि शेतकरी संघटकचे संपादक प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांच्यासाठी 20 लाख
देखभाल करणारे अनंत देशपांडे यांच्यासाठी 20 लाख
वाहनचालक बबनराव गायकवाड यांच्या नावे 10 लाख
हिंगणघाटच्या बुडीत शेतकरी सॉल्वंट कारखान्याच्या बागधारक शेतकर्‍यांसाठी 25 लाख
रावेरमधल्या सीता मंदिरासाठी 13 लाख
21 एकरापैकी 6 एकर जागेवरच्या सभागृहाचा वापर शेतकरी संघटना प्रतिष्ठानासाठी करण्यासाठी सूचना
त्याची जबाबदारी रवी काशीकर यांना सांभाळायची आहे
मुली गौरी आणि श्रेया यांच्या फक्त नावे पुण्यातील बोपोडी परिसरातील घर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close