मोदींनी पाकिस्तानातल्या जनतेचं मन दुखावलंय, हाफिज सईदचा जळफळाट

December 26, 2015 7:16 PM0 commentsViews:

hafiz saied26 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौर्‍याची जगभरात प्रशंसा होतेय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सुधारण्यासाठी मोदींच्या दौर्‍याची मदत होईल, असं अमेरिकेने म्हटलंय. पण पाकिस्तानात मोदींच्या झालेल्या भव्य स्वागतामुळे मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा जळफळाट झालाय.

नरेंद्र मोदींनी पाकिस्तानात येऊन पाकिस्तानातल्या जनतेचं मन दुखावलंय. त्यांचं पाकिस्तानात स्वागत का केलं गेलं असाही प्रश्न त्याने विचारलाय. अफगाणिस्तानच्या दौर्‍यात मोदींनी पाकिस्तानला दहशतवादासाठी जबाबदार ठरवलं आणि नंतर ते पाकिस्तानला आले, असं हाफिज सईदने म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close