सत्तेसाठी थोर पुरुषांच्या नावाचा वापर केला जातोय-गडकरी

December 26, 2015 7:40 PM0 commentsViews:

044513nitin_gadkari26 डिसेंबर : आपल्या मुलाला, मुलीला आणि चमच्यांना तिकीट देऊन सत्ता घेण्यासाठी थोर पुरुषांची नावं घेतली जातात आणि हे सर्वच पक्षांमध्ये होतं असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीकास्त्र सोडलं. ते अकोल्यात मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

राजकारणात आजकाल जे सुरू आहे, ते राजकारण नाही. राष्ट्रकारण, समाजकारण आणि अर्थकारण हा राजकारणाचा अर्थ आहे. पण राजकारण आता केवळ सत्ता कारण झालंय असंही गडकरी म्हणाले.

विदर्भात सोयाबीन पिकांची घात अधिक प्रमाणात होत आहे. सोयाबीनच्या पिकात घट का होत आहे. याच उत्तर आपल्या कृषी विद्यापीठ आणि महाबीजकडे नाही. तर, कृषी विद्यापीठाची आणि महाबीजच्या मोठ मोठ्या इमारतींचा उपयोग काय ? असा सवालही गडकरी यांनी केला. विशेष म्हणजे महाबीजचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार संजय धोत्रे यावेळी मंचावर उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close