मुंबई एंट्री पॉइंटवर पाचपट वसुली होऊनही टोलधाड सुरुच

December 26, 2015 8:43 PM0 commentsViews:

26 डिसेंबर : कोल्हापुरात टोल रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली. पण, राजधानी मुंबापुरी अजूनही टोलधाडीने लुटली जात आहे. मुंबईच्या एंट्री पॉइंटवर बांधलेल्या पुलांचा खर्च 1560 कोटी होता. टोलच्या माध्यमातून तब्बल पाचपट म्हणजे 7322 कोटी रुपये वसुली होऊन सुद्धा अजूनही टोलवसुली सुरुच आहे.mumbai vashi toll

1995 ते 1999 या युती सरकारच्या काळात नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना एकूण 55 उड्डाणपुल बांधले गेले ज्याचा खर्च होता 1560 कोटी रुपये…या सोळा वर्षांच्या काळात टोल, सेझ रुपाने राज्य सरकार आणि टोल वसूल करणारी कंपनी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरला 7322 कोटी रुपयांची मिळकत झालीय आणि तरीही टोलवसुली सुरूच आहे. ही आकडेवारी राज्यसरकारच्या
टोलवसुलीच्या धोरणाची सत्यता स्पष्टपणे दाखवते. माहितीच्या अधिकारात मिळालेली ही आकडेवारी असल्याने ती चुकीची आहे असं ना राज्यसरकार म्हणू शकतंय. ना मुंबई एन्ट्री पॉईंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी..

मुंबई एंट्री पॉइंट म्हणजेच मुंबईत शिरण्याचे पाच मुख्य रस्ते, आणि त्यावर लावलेला टोल. आनंद नगर मुलुंड, ऐरोली, वाशी,दहिसर आणि मुलुंड एलबीएस रोड किंवा ज्याला जुना टोलनाका म्हटलं जातं असे हे पाच रस्ते…या टोलनाक्यावरुन रोज जाणार्‍या वाहनांची संख्या
एईपी खोटी दाखवते हे लक्षात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. या समितीनं वाहनांच्या संख्येच्या मोजमापासाठी समर्थ इन्फोटेकला नेमलं. त्यांनी दिलेली वाहनसंख्या आणि एमईपीने
दिलेली वाहनसंख्या यात फारच तफावत आढळली. समर्थ इन्फोटेकच्या मते रोज सरासरी 2 लाखाहुनही अधिक लहान मोठी वाहनं या
टोलनाक्यावरुन जातात. त्यापायी 475.06 कोटी रुपये दरवर्षी टोलरूपी मेप वसूल करते. यापैकी सगळा होणारा खर्च वगळता 361 कोटी रुपये निव्वळ नफा मेप कमावते.

माहितीच्या अधिकारअंतर्गत मिळालेली ही माहिती संबंधित मंत्र्यांना माहित नाही की, सोयीनं त्याकडे डोळेझाक केली जातेय. टोलचा हा झोल संपुष्टात आणण्यासाठी गरज आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close