मुस्लिम समाजाकडून शिवजयंती साजरी

February 19, 2010 3:07 PM0 commentsViews: 4

19 फेब्रुवारीसांगलीत आज मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुस्लिम समाजाच्या वतीने हार घालण्यात आला. तसेच यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या सय्यद बंडा, हिरोजी फर्जद अशा मुस्लिम शिलेदारांची माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाला महिला आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती. शिवनेरीवर शासकीय पूजामुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शिवनेरी गडावर जाऊन शिवप्रतिमेचे पूजन केले. तर जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी शासकीय पूजा केली. दरम्यान पुण्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी गडावर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली. गडावर आज 500 सुरक्षा कर्माचारी तैनात होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मराठा महासंघाच्या मागणीशी आपण सहमत आहोत, असे मुख्यमंत्री भाषणात म्हणाले. नागपूरमध्ये उत्साहनागपूरमध्येही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. नागपूरच्या गांधी गेट येथील शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. याच निमित्ताने लहान मुलांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सगळे विद्यार्थी मावळ्यांच्या वेशात आले होते. यावेळी 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. सोलापुरात सांस्कृतिक कार्यक्रमसोलापूरमध्येही शिवजयंती जोरदार साजरी करण्यात आली. यावेळी सोलापुरमधील मान्यवर मंडळी उपस्थित होती. शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

close