अमेरिकेच्या दबावामुळे मोदी पाकिस्तानला गेले -प्रकाश आंबेडकर

December 26, 2015 9:28 PM0 commentsViews:

26 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानभेटीविषयी भारतात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना लक्ष्य केलंय. अमेरिका आणि युरोपच्या दबावामुळे मोदी पाकिस्तानला गेले असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय.prakash ambedkar on modi

अमेरिका आणि युरोपकडून पाकला मिळणारी आर्थिक मदत थांबवावी. त्यानंतर पाक आर्थिक अडचणीत येईल तेव्हा भारतानं त्यांच्याशी चर्चा करावी असं मतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. आर्थिक मदत पाक लष्कराकडे वळवली जाते, त्यातून लष्करी कुरघोडी सुरू होते. हे लक्षात ठेवावं. भाजपने दाऊदची रिटर्न गिफ्ट म्हणून मागणी करावी. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असं आंबेडकर म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close