सेहवाग नंबर वन

February 19, 2010 3:18 PM0 commentsViews: 122

19 फेब्रुवारीदक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा वीरेंद्र सेहवाग टेस्ट रँकिंगमध्ये नंबर वन बनला आहे. नागपूर टेस्ट आणि त्यानंतर झालेल्या कोलकाता टेस्टमध्ये सेहवागने सलग दोन सेंच्युरी केल्या होत्या. या सीरिजमध्ये त्याने जवळपास 97च्या स्ट्राईक रेटने 290 रन्स केले. वीरेंद्र सेहवागच्या खात्यात आता 863 पॉईंट जमा झालेत. याआधी टेस्ट रँकिंगमध्ये टॉपवर असलेल्या गौतम गंभीरची मात्र घसरण झाली आहे. गंभीर आता पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. या सीरिजमध्ये त्याची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नव्हती. त्याला दोन टेस्ट मॅचमध्ये केवळ 38 रन्सच करता आले होते. गंभीरच्या खात्यात आता 824 रन्स पॉईंट झालेत. दक्षिण आफ्रिकेचा झुंजार बॅटसमन हाशिम अमला या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारताविरुध्दच्या दोन टेस्टमॅचमध्ये त्यानं तब्बल तीन सेंच्युरी केल्या आहेत.

close