नौदलात मिग-29 दाखल

February 19, 2010 3:22 PM0 commentsViews: 5

19 फेब्रुवारीभारतीय नौदलाच्या ताफ्यात आज अत्याधुनिक मिग-29 लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. रशियाच्या मिग-29 के या लढाऊ विमानांवरून या भारतीय बनावटीच्या विमानांची रचना करण्यात आली आहे. गोव्यातील वास्को येथील नौदलाच्या तळावर एका विशेष कार्यक्रमात ही फायटर प्लेन नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. सुरुवातीला 4 फायटर प्लेनचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. एकूण 45 मिग-29 फायटर प्लेन भारतीय नौदलाला मिळणार आहेत. भारतीय नौदलात आयएनएस 'विराट' ही एकमेव विमानवाहू युद्धनौका सध्या कार्यरत आहे. 2012मध्ये नवी विमानवाहू युद्धनौका आयएनएस 'विक्रमादित्य' ही भारतीय ताफ्यात दाखल होईल. त्या युद्धनौकेवर ही मिग-29 फायटर प्लेन वापरली जातील. मिग-29 फायटर प्लेन ही या आधीच्या मिग फायटर प्लेनपेक्षा, अधिक कार्यक्षम असल्याचे नौदल अधिकार्‍यांचा दावा आहे.

close