डॉ. कुलकर्णी दाम्पत्य हत्येप्रकरणी तिघांना अटक

December 27, 2015 4:13 PM0 commentsViews:

crime

27 डिसेंबर : गेल्याच आठवड्यात झालेल्या डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या हत्येने इस्लामपूर शहर हादरून गेले होते. या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. डॉ.कुलकर्णी यांची नर्स सीमा यादव, तिचा प्रियकर निलेश दिवाणजी आणि अर्जुन पवार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना 7 दिवसांची म्हणजे 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जागेच्या कारनातून आणि खंडणी, आर्थिक कारणातून हा खून केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र पोलिसांनी अद्याप खुनाचा नेमकं कारण जाहीर केलं नाही. या हत्या प्रकरणात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.

इस्लामपूरमध्ये 20 डिसेंबरला डॉ. प्रकाश कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांची राहत्या घरी चाकून भोसकून हत्या करण्यात आली होती. डॉ. प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरुममध्ये, तर त्यांच्या पत्नीचा म्हणजे डॉ. अरुणा कुलकणीर्ंचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळला होता. दुहेरी हत्येची या घटनेमुळे शहरात खळबळ माजली होती. घटना स्थळाचा आढावा घेतल्या नंतर हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होत, मात्र नेमकं कारण स्पष्ट होत नसल्याने या खुनाचा तपास करणे पोलिसां समोर आव्हान निर्माण झालं होत. अखेर या प्रकरणातील आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close