तेलंगणात महायज्ञाच्या मंडपाला आग

December 27, 2015 4:34 PM0 commentsViews:

telangana-fire-759

27 डिसेंबर : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पुढाकाराने मेडक जिल्ह्यात आयोजित केलेल्या महायज्ञाच्या मंडपाला आज (रविवारी) अचानक आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती तेलंगणचे मंत्री के.टी.राव यांनी दिली.

23 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या यज्ञाचा आजचा शेवटचा दिवस आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी या यज्ञासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या फार्महाऊसवरच हा भव्य यज्ञ सुरू असून विश्वशांतीसाठी हा यज्ञ सुरू आहे. या यज्ञावर राव यांनी सात कोटी रुपये खर्च केले आहेत. पण यज्ञावर सरकारी पैसा खर्च केलेला नसून स्वत:च्या शिशातून करत असल्याचं राव यांनी सांगितलं. या यज्ञासाठी आजूबाजूच्या राज्यांमधून जवळपास 2 हजार पुजारी बोलवण्यात आले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close