चंद्रपूरमधल्या नवेगावमध्ये तीन बछड्यांचा मृत्यू

December 27, 2015 9:38 PM0 commentsViews:

27 डिसेंबर : देशाच्या व्याघ्र बचाव मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. कारण चंद्रपुर जिल्हयातील वाघांच्या तीन बछड्यांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आणखी एक बछडा गंभीर आजारी असून त्याला उपचारासाठी चंद्रपुर पशू रुग्णालायात पाठवण्यात आलं आहे. सावली तालुक्यातील पाथरी परिसरातील नवेगाव बिटात ही घटना घडली. मृत पावलेल्या पिल्लांचं वय 4 महिने असल्याचं कळतं आहे.

आज सकाळी नवेगाव मार्गावर फिरायला गेलेल्या नागरिकांना ही पिल्लं मृतावस्थेत आढळली. त्यांनी या घटनेची माहिती वन कर्मचार्‍यांना दिली. त्यानंतर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, थंडीमुळे या 3 बछड्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे. तरी देखील शवविच्छेदनानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं वनाधिकार्‍यांनी सांगितलंय. तसंच, या बछड्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येईल, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close