येत्या काही वर्षात देशाला नवीन संसद भवन मिळण्याची शक्यता

December 28, 2015 9:10 AM0 commentsViews:

sansad bhavan328 डिसेंबर : येत्या काही वर्षांमध्ये देशाला नवी संसद इमारत मिळण्याची शक्यता आहे. नव्या संसद इमारतीचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे पाठवला आहे.

नवी इमारत सध्याच्या इमारतीच्या आवारात किंवा राजपथवर एका ठिकाणी बांधू शकतो, असंही या प्रस्तावात म्हणण्यात आलंय. 2026 नंतर लोकसभा खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

तेव्हाच्या गरजा लक्षात घेता आताची इमारत लहान पडू शकते, असं महाजन यांचं म्हणणं आहे. जुलै 2012 साली तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनीही असाच प्रस्ताव पाठवला होता, पण त्याला तेव्हा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

नव्या इमारतीचा प्रस्ताव का देण्यात आला ?

- 2026 साली खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता
– सध्याच्या सभागृहांमध्ये जागा वाढवणं शक्य नाही
– आताची इमारत हेरिटेज वास्तू असल्यामुळे मोठे बदल अशक्य
– नवीन इमारतीत अद्ययावत तंत्रज्ञान वापरता येईल
– सुरक्षा यंत्रणांच्या मागण्या वाढल्या आहेत, जुनी इमारत यातही कमी पडतेय
– सध्याची इमारत 1927 साली पूर्ण झाली होती. म्हणजेच या इमारतीला 88 वर्षं पूर्ण झाली आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close