‘मिहान’मध्ये 63 कंपन्यांना नोटीसा पाठवणार, विप्रो, डीएलएफचा समावेश

December 28, 2015 9:16 AM0 commentsViews:

mihan nagpur28 डिसेंबर : नागपूरमधील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींबद्दल वाद निर्माण झालाय. ‘मिहान’मध्ये ज्या उद्योजकांनी जमिनी ताब्यात घेऊन उद्योग सुरू केलेला नाही आणि ज्यांनी उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा सर्व उद्योजकांसोबत बैठक घेण्यात येईल,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे झालेल्या मिहान प्रकल्प प्रगती आढावा बैठकीत दिली.

ही जमीन का परत घेण्यात येवू नये अशी नोटीस सरकारनं पाठवली आहे. या कंपन्यांमध्ये डी.एल.एफ. एच.सी.एल. विप्रो, मॅक्स एअरोस्पेस आणि हल्दिराम या यातल्या मुख्य कंपन्या आहेत. या नोटीशीला या कंपन्या काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मिहानबद्दलच्या बैठकीला जेट, इंडिगो, स्पाईस या विमान कंपन्याच्या पदाधिकार्‍यांनाही चर्चेसाठी आमंत्रित करण्यात यावं अशी सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. मिहान प्रकल्पात सेझ व सेझबाहेर एकूण 81 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचाही या बैठकीमागचा उद्देश आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close