बाळासाहेब भाजपवर कडाडले

February 20, 2010 9:11 AM0 commentsViews: 5

20 फेब्रुवारीराम मंदिर उभारण्यास मुस्लिमांनी मदत करावी या भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विधानावर 'सामना'मध्ये जोरदार टीका करण्यात आली आहे.'गडकरी तंबू मजबूत करा' या मथळ्याखाली हे संपादकीय लिहिण्यात आले आहे. राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम नेत्यांकडे विनवणी करणे हा बाबरी मशीद पाडताना शहीद झालेल्या कारसेवकांचा अपमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जर राम मंदिरासाठी मुस्लिमांचीच परवानगी घ्यायची होती, तर मग आंदोलनच का उभारले? त्यापेक्षा जामा मशिदीच्या इमामाच्या पायाशी जाऊन बसले असते तरी काम झाले असते, अशी टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे

close