नव्या वर्षात नवी सुरुवात, 15 जानेवारीला भारत-पाक द्विपक्षीय चर्चा

December 28, 2015 11:27 AM0 commentsViews:

india pak 3328 डिसेंबर : भारत-पाकिस्तान परराष्ट्र सचिवांच्या पातळीवर नवीन वर्षात म्हणजेच 15 जानेवारी 2016 च्या दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्रातील बातमीनुसार नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांनी भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. आता पाकिस्तान भारत सरकारच्या उत्तराची वाट पाहतंय.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज याच महिन्यात पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेल्या होत्या. यावेळी दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याचा मुद्दा पुढे आला होता. ही चर्चा होण्याचं ठरल्यास या चर्चेत दहशतवाद, व्यापार, काश्मीरचा मुद्दा याबाबत चर्चा व्हावी यासाठी एक आराखडा तयार केला जाऊ शकतो. यापूर्वीही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्या होत्या. पण 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील चर्चा थांबली होती. आता होणार्‍या चर्चेला सर्वंकष द्विपक्षीय चर्चा असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला जाऊन नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. या भेटीचे आता परिणाम दिसून येऊ लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close