मुंबई पोलीस आता ट्विटर, तक्रारीचा करू शकता ट्विट !

December 28, 2015 12:41 PM0 commentsViews:

mumbai police twiiter28 डिसेंबर : ऑनड्युटी 24 सेवा बजावणारे मुंबई पोलीस आता ट्विटरवर सुद्धा हजेरी लावणार आहे. मुंबई पोलिसांनी आता स्वता:चं ट्विटर हँडल सुरू केलंय. यावर तुम्ही तुमच्या तक्रारी, समस्या, सूचना आता मुंबई पोलिसांना ट्वीट करू शकता. ज्यावर त्वरित कारवाई केली जाईल, असा मुंबई पोलिसांचा दावा आहे.

@MumbaiPolice या ट्विटर हँडलवरतुम्ही ट्वीट करू शकता. एवढंच नाही, तर मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद हेही ट्वीटरवर येतायत. त्यांचं हँडल आहे @CPMumbaiPolice. आज हे दोन्ही हँडल अधिकृतरित्या सुरू झाले आहे. याआधी बंगळुरू पोलिसांनीही आपलं ट्विटर अकाऊंट सुरू केलं होतं. आता त्यात मुंबई पोलिसांचीही भर पडली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close