काँग्रेसच्या वर्धापनदिनीच निरुपमांची नेहरू आणि गांधी घराण्यावर टीका

December 28, 2015 1:33 PM0 commentsViews:

nirupam congress28 डिसेंबर : आज काँग्रेस पक्षाचा 131 वा स्थापना दिवस सगळीकडे साजरा केला जात असतानाच मुंबई काँग्रेसचं हिंदी भाषेतील मुखपत्र असलेल्या काँग्रेस दर्शन या मासिकातून हायकमांडमधील नेत्यांवरच टीका करण्यात आलीये.

या मासिकातून प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन परराष्ट्रमंत्री वल्लभभाई पटेल यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना काश्मीर प्रश्न हाताळताना नेहरूंनी वल्लभभाईंचं म्हणणं ऐकलं असतं काश्मीरप्रश्न एवढा चिघळला नसता असा उल्लेख करण्यात आलाय.

एवढंच नाही तर सोनिया गांधी यांच्याबद्दल लिहिताना सोनिया यांचे वडिल हे फॅसिस्ट सैनिक होते असं लिहिण्यात आलंय. सदर लेख ही एक चूक असल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि या मुखपत्राचे संपादक संजय निरूपम यांनी स्पष्ट केलंय. झाल्या चुकीबद्दल त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close