उल्हासनगरमध्ये पोलिसगिरी, प्रेमीयुगुलांना मारहाण

December 28, 2015 1:46 PM0 commentsViews:

28 डिसेंबर : उल्हासनगरमध्ये प्रेमीयुगुलांवर कारवाई करत असताना पोलिसांच्या अरेरावीचा कहर पाहायला मिळाला. पोलिसांनी प्रेमीयुगुलांना मारहाण करत शिवीगाळ केली.ulashnagar police4

उल्हासनगरमधल्या प्रभात गार्डन आणि परिसरात प्रेमी युगुल येत असतात. त्यांच्यापैकी काही जण गैरवर्तन करतात. याचा त्रास इथल्या नागरिकांना होतो. नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रेमीयुगुलांवर कारवाई केली. मात्र ही कारवाई करत असताना पोलिसांची अरेरावी पाहायला मिळाली. पोलिसांनी या प्रेमी युगुलांना शिवीगाळ आणि मारहाण केली. काल रविवारी येथील रहिवासी पोलिसांना घेवून आले. यावेळी अनेक प्रेमी जोड़पे इथं अश्लील चाळे करत तर काही गांजा आणि बियर पित असताना आढळून आले. पोलीस आल्याचे पाहाताच अनेकांनी पळ काढला तर इतराना पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी पिटाळुन लावले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close