चंद्रपूर जिल्ह्यातल्या नवेगाव वनपरिक्षेत्रात चौथ्या बछड्याचाही मृत्यू

December 28, 2015 3:14 PM0 commentsViews:

AnFNW8R1Scig3Hnzvzbony809Q2I0H6JN-Mwe93i-Z6D

28 डिसेंबर :  चंद्रपुरातल्या वनपरिक्षेत्रातील नवेगावमध्ये वाघाच्या वाघाच्या चौथ्या बछड्याचाही मृत्यू झाला आहे. हा चौथा बछडा आजारी असल्यानं त्याच्यावर उपचार सुरू होते. पण आता त्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. तसंच या बछड्यांचा मृत बछड्यांच्या आई असलेल्या वाघीणीचा शोध वनविभागाचे कर्मचारी घेत आहे.

हे मृत बछडे 4 महिन्यांचे आहे. रविवारी सकाळी नवेगाव मार्गावर फिरायला गेलेल्या नागरिकांना हे बछडे मृतावस्थेत आढळली. त्यांनी या घटनेची माहिती वन कर्मचार्‍यांना दिली. त्यानंतर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक बछडा आजारी अवस्थेत आढळल्याने त्याला चंद्रपूरच्या पशु रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र, तिथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा दुदैवी मृत्यू झाला.

या आधी 3 बछड्यांचा थंडी आणि दूध न मिळाल्याने दुदैर्वी मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. तसंच पोस्टमॉर्टेम अहवालातून मृत्यूचं खरं कारण समोर येईल असंही वनाधिकार्‍यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयात भेट देऊन बछडयाची पाहणी करताना या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मृत बछड्यांची आई असलेल्या वाघीणीची वनविभागाने युध्दपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे. यासाठी परिसरात 16 कॅमेरे ट्रॅपींगसाठी लावण्यात आले आहेत. या बछड्यांच्या मृत्यूमागे नेमकं कोणते कारण आहे, याचा शोध घेण्याचं आव्हान वन विभागापुढे आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close