जॉर्ज फर्नांडिस बेपत्ता

February 20, 2010 9:27 AM0 commentsViews: 34

20 फेब्रुवारीलढाऊ बाण्यासाठी प्रसिध्द असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस हे अचानक बेपत्ता झाले आहेत. ते कुठे आहेत, याची कोणालाच माहिती नाहीये. त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि जवळचे मित्र जॉर्ज यांची संपत्ती आणि राजकीय वारशासाठी कायदेशीर लढाया लढण्यात व्यस्त आहेत.मुलगा आणि पत्नीवर आरोपफायटर म्हणून ओळखले जाणारे जॉर्ज फर्नाडीस राजकीय पटलावरुन बेपत्ता झाले आहेत. एकेकाळचे दमदार, प्रभावशाली राजकीय नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज सध्या गायब आहेत. फर्नांडिस यांचा मुलगा आणि पत्नीने त्यांना औषधोपचाराच्या नावाखाली अज्ञातस्थळी हलवल्याचा आरोप जॉर्ज यांच्या मित्रांनी केला आहे. जॉर्ज यांना अल्झिमर या व्याधीने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांनी आपली स्मरणशक्ती गमावली आहे. याचाच फायदा त्यांच्या पत्नीने उचलल्याचा आरोप जॉर्ज यांचे मित्र अजय सिंग यांनी केला आहे.जॉर्ज फर्नांडिस यांचा राजकीय वारस कोण हा खरा वाद यामागे आहे. तब्बल दोन दशकांनतर त्यांची पत्नी लैला आणि मुलगा सिन फर्नांडिस त्यांच्या जीवनात परतलेत. आणि लगेचच त्यांनी जॉर्ज यांचा मित्र आणि भावावर 25 कोटी रुपयांची संपत्ती बळकावण्याचा डाव असल्याचा आरोप केला.स्वाक्षरी मोहीम आता जॉर्ज यांची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे जवळचे मित्र माजी सरन्यायाधीश वेंकटचलैय्या यांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. जनतेसाठी ज्यांचे दार सतत उघडे असायचे त्या लोकनेत्याच्या घराचे दरवाजे आज बंद आहेत. हा नेता जिवंत तरी आहे की नाही, हेही लोकांना माहित नाही. त्यांच्या भावाने आता या संदर्भात हाय कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.'जॉर्ज सुरक्षित आहेत'दरम्यान जॉर्ज बेपत्ता असल्याच्या बातमीचा त्यांच्या पत्नी लैला फर्नांडिस यांनी इन्कार केला आहे. जॉर्ज सुरक्षित असून उपचार घेत असल्याचे त्यांनी CNN-IBN शी फोनवरून बोलताना स्पष्ट केले. जॉर्ज यांच्यावर हरिव्दार इथे बाबा रामदेव यांच्या आश्रमात उपचार सुरू आहेत. आम्ही नातेवाईकांसह, समता पक्षांच्या नेत्यांच्याही संपर्कात आहोत असेही त्या म्हणाल्या आहेत.

close