‘समृद्ध जीवन’चे संचालक महेश मोतेवार पोलिसांच्या ताब्यात

December 28, 2015 4:55 PM0 commentsViews:

Mahesh1321

28 डिसेंबर : समृद्ध जीवन चिटफंड घोटाळातील मुख्य सूत्रधार महेश मोतेवार यांना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात मोतेवारांना ताब्यात घेतलं असून सध्या त्यांना पुण्याहून उस्मानाबादला नेण्यात येत आहे.

महेश मोतेवार यांना उस्मानाबाद पोलिसांनी फरार घोषित केलं होतं. चिटफंड प्रकरणी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

फसवणुकीच्या गुन्ह्यात महेश मोतेवार यांना CRPC 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आलं आहे. नेहमी व्हीआयपी नेते आणि राजकीय पुढारी यांच्यासोबत खुलेआम फिरणारा महेश मोतेवार गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे पोलीस मोतेवारला अभय तर देत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

महेश मोतेवारवर उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्यात 420 , 448 , 427 , 491, 34 कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दूध डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून 35 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवार यांना फरार घोषित केलं होतं.

काय आहे प्रकरण?

- उस्मानाबादच्या येणेगूरमधील दूध प्रकल्पात भागीदारांची फसवणूक
– न्यायालयाच्या आदेशानं 2012मध्ये मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– पुण्यात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल
– मोतेवारांच्या ‘समृद्ध जीवन’ कंपनीला गुंतवणूक घेण्यास सेबीकडून मनाई
– मनाई आदेशाचं करण्यात आलं उल्लंघन
– मोतेवार यांनी 3000 कोटींची फसवणूक केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

 मोतेवार अटक, पुढे काय?

- पुण्याहून अटक, उस्मानाबादला आणणार
– मंगळवारी सकाळी उमरगा सत्र न्यायालयात हजर करणार
– पोलिस मोतेवारची कोठडी मागण्याची शक्यता
– पुण्यात सेबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात मोतेवारने यापूर्वीच मिळवला होता अटकपूर्व जामीन
– काही गुन्ह्यांमध्ये स्थानिक पोलिस मोतेवारला ताब्यात देण्याची मागणी करु शकतात

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close