पीआयचा डोळा फोडला

February 20, 2010 9:36 AM0 commentsViews: 5

20 फेब्रुवारीरात्री लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी नाकारणार्‍या पोलीस इन्स्पेक्टरचा गावकर्‍यांनी डोळाच फोडल्याची गंभीर घटना गोंदिया जिल्ह्यातील कारंजा गावात घडली आहे. कारंजा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात रात्री 12नंतरही डीजी साऊंड सुरू होता. यावेळी पोलीस इन्स्पेक्टर महाजन यांनी गावकर्‍यांना हा कार्यक्रम बंद करण्यास सांगितले. पण पोलीस कार्यक्रमात अडथळा आणत आहेत, या कारणावरून गावकर्‍यांनी महाजन आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांना घेराव घातला. आणि त्यांच्यावर दगडफेक केली. यात पोलीस इन्स्पेक्टर महाजन यांचा डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांनीच लाठीमार केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

close