पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर

February 20, 2010 10:25 AM0 commentsViews: 7

20 फेब्रुवारीपवनराजे हत्याकांडातील प्रमुख आरोपी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या शेजारी बसून त्यांच्याशी गप्पा मारत असणार्‍या पद्मसिंह पाटलांना आज हजारो लोकांनी पाहिले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी मंत्री राणा जगजितसिंह यांनीच आयोजित केला होता.'पद्मसिंहांना बळ द्या' या कार्यक्रमासाठी 10 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी 'पद्मसिंह पाटलांना बळ द्या' असे आवाहन पवार आणि प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी केले.पद्मसिंह यांच्यावर पवनराजेंच्या हत्येचा आरोप आहे. याप्रकरणी अटक झाल्यानंतर 8 महिन्यांपूर्वी पद्मसिंहांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. अजूनही त्यांचे खासदारपद रद्द झालेले नाही. खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांच्यावर कारवाई न करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनाला पद्मसिंह यांना बोलावले नव्हते.'पक्षाला गैर वाटत नाही''पद्मसिंह पाटील यांचे निलंबन अजूनही मागे घेतलेले नाही. खटला सुरू आहे, तोपर्यंत निलंबन कायम असेल. शिवाय खासदार या नात्याने ते कार्यक्रमाला हजर राहू शकतात. त्यात आम्हाला गैर वाटत नाही', असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते गुरुनाथ कुलकर्णी यांनी 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले आहे.

close