10 लाख उत्पन्न असणार्‍यांना नवीन वर्षात सबसिडी नाही

December 28, 2015 9:52 PM0 commentsViews:

LPG gas sucidy

28 डिसेंबर : 10 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणार्‍यांची एलपीजी सबसिडी बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ही योजना 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहे.

जर एखाद्या ग्राहकाची किंवा त्याच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात 10 लाख रूपये इतके असेल तर जानेवारी महिन्यापासून अशा ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावं लागणार आहे.

जे लोक सक्षम आहेत अशांनी एलपीजी सबसिडी स्वत:हून सोडावी असं आवाहन सरकारतर्फे यापूर्वीच करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या ‘गिव्हइटअप’ मोहिमेनंतर 57 लाख 50 हजार लोकांनी एलपीजी सबसिडी घेणे सोडून दिल्याची आकडेवारीही समोर आली आहे.

या योजनेचा हेतू एक विशेष वर्गाला फायदा मिळवून देणं हा असल्याची भूमिका पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे वितरीत करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात मांडली आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी स्वत:हून एलपीजी सबसिडी सोडून दिली आहे. हे लक्षात घेत अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांनी बाजारभावाने एलपीजी खरेदी केलं पाहिजं असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे. ही योजना जानेवारी 2016 पासून लागू होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close