परभणीत भीषण दरोडा, नराधमांनी गर्भवती महिलेवर केला सामूहिक बलात्कार

December 29, 2015 9:35 AM0 commentsViews:

parbhani429 डिसेंबर :परभणीच्या पाथरीमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय. सेलू रोड आणि खेडुळा पाटी भागात शेतातील आखाड्यावर दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत आखाड्यावरील शेतकर्‍यांना कत्तीने मारहाण केली यात 3 जण जखमी झाले. कौर्याची सिमा गाठत 3 दरोडेखोरांनी एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केला. अवघ्या काही तासांत या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

परभणी च्या पाथरी-परभणी या राष्ट्रीय महामार्गाशेजारील सेलूरोड येथील सय्यद शाहबुद्दीन सय्यद बशीर यांच्या व खेडूळा रोड वरील दामोधर पितळे या 2 शेतकर्‍यांच्या शेत आखाड्यावर रात्री 4 जनांनी हैदोस घातला. दरोडेखोरांच्या मारहाणीत 3 जण गंभीर जखमी झाले आहे. दरोडेखोर एवढ्यावरच थांबले नाहीतर त्यांनी एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला उचलून नेलं आणि तिच्यावर 3 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित गर्भवती महिला आणि जखमींवर सेलू रोड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून चार जणांना अटक केली. या चौघांची ओळख परेडही करण्यात आली. पीडित महिलेनं यातील तिघांना ओळखलंय. या प्रकरणी पाथरी पोलिसांनी तत्काळ दखल घेत चोरी बलात्कार मारहाण करण्याचे गुन्हे दाखल केले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close