भिंवडीत 2 मजली इमारत कोसळली

December 29, 2015 11:57 AM0 commentsViews:

bhiwandi423q29 डिसेंबर : ठाण्यातील  भिवंडी शहरातील ईदगाह रोड- तांडेल मोहल्ला या ठिकाणी आज (मंगळवारी) सकाळी 2 मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाराखाली 9 जण अडकले होते. त्यापैकी आतापर्यंत 8 जणांना बाहेर काढण्यात आले आहे.

पण 1 नागरिक अजूनही आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. भिवंडी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर त्वरीत घटनासथ्ळी पोहचले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close