खर्‍या आयुष्यात ‘बाजीरावा’चीच ‘मस्तानी’, रणवीर-दीपिकाचा फेब्रुवारीत साखरपुडा ?

December 29, 2015 12:04 PM0 commentsViews:

ranveer dipika29 डिसेंबर : ‘बाजीराव-मस्तानी’ साकारणारे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण खर्‍या आयुष्यात मात्र एकत्र भेटणार आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये दोघेही साखरपुडा करणार असल्याचं कळतंय.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे नेहमी एकमेकांसोबत सगळीकडे फिरत असले तरिही आपल्या नात्याबद्दल ते कधीच काही थेटपणे कबूल करत नाहीत..मात्र आता त्यांनी या नात्याला नवी ओळख देण्याचं ठरवलेलं दिसतंय. रणवीर आणि दीपिका येत्या फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा करणार असल्याचं समजतंय. फक्त तारीख नक्की करण्यापूर्वी एकमेकांच्या घरच्यांची परवानगी मिळणं बाकी आहे. रणवीरच्या घरच्या मंडळींना दीपिका पसंत असली तरीही दीपिकाच्या घरी ही परिस्थिती नाही. त्यामुळेच सगळ्यांची संमती मिळवून मगच पुढचा निर्णय जाहीर करायचं या दोघांनीही ठरवलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close