गर्भलिंग निदानाचा ‘कार’नामा; दोन डॉक्टरांना अटक

December 29, 2015 2:48 PM0 commentsViews:

Pandharpur sex detection

29 डिसेंबर : पंढरपुरात बेकायदेशीर रित्या गर्भलिंग निदान करणार्‍या फिरत्या केंद्रावर पंढरपूर पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून सोनोग्राफी मशिनसह एक मोटारही जप्त करण्यात आली आहे.

पंढरपूर शहरात एका अल्टो मोटारीत गर्भलिंग निदान केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या केंद्रावर छापा टाकला. त्यावेळी मोटारीत एक सोनोग्राफी मशिन आणि गर्भवती महिला आढळून आल्या. पोलिसांनी सोनोग्राफी मशिन आणि मोटार जप्त करून गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या गर्भवती महिलांना ताब्यात घेतलं. या कारवाईत डॉ. गाडे, डॉ. मोरे यांच्यासह 3 नर्सना अटक केली. याप्रकरणातला आणखी एक आरोपी डॉक्टर हितेंद्र ठाकुर मात्र अजूनही फरार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close