हिंजवडीतील कंपनीत काम करणार्‍या महिलेवर बलात्कार, दोघांना अटक

December 29, 2015 4:45 PM0 commentsViews:

rape_634565

29 डिसेंबर : पुण्यातील हिंजवडीमधल्या एका खासगी कंपनीच्या महिला कर्मचार्‍यावर कंपनीतच बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या कंपनीमध्येच काम करणार्‍या दोघांना अटक केली. परितोष लाला आणि किसन महाडिक अशी अटक केलेल्या नराधमांची नावं आहेत.

पीडित महिला हिंजवडीतील खासगी कंपनीच्या कैंटिनमध्ये कॅशिअर म्हणून काम करते. पीडित महिलेचे प्रेमसंबध उघड करण्याची धमकी देऊन या दोघा नराधमांनी तिला कॅन्टीनच्या वॉश रूममध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यांनतर तिचे फोटो काढले. पोलिसांत तक्रार दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकीही तिला देण्यात आली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने लगेचच पोलिसांकडे तक्रार करण्यास धाव घेतली नाही. अखेर मंगळवारी तिने पोलीस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. हिंजवडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close