बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 13

February 20, 2010 12:10 PM0 commentsViews:

20 फेब्रुवारीपुणे बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे स्फोटातील मृतांची संख्या आता 13 झाली आहे. अतुल गणपत अनाप असे आज मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो 30 वर्षांचा होता. केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान बॉम्बस्फोटाला आता एक आठवठा झाला आहे. अजूनही तपासाला उशीर होत असल्याने हा तपास आता एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंतचा तपासातील घटनाक्रम असा आहे- – तपासात सगळ्यात पहिली माहिती हाती आली ती बॉम्बस्फोटासाठी अमोनिअम नायट्रेट, आरडीएक्स, हायड्रोपेट्रोकार्बन ऑईल यांचे मिश्रण वापरले गेले – त्यानंतर स्फोटासाठी रिमोट कंट्रोलचा वापर झाल्याचे संकेत मिळाले- दरम्यान नॅशनल सिक्युरीटी गार्डच्या टीमनेही इथे येऊन पाहणी केली आणि काही पुरावेनेले. पण त्याचा रिपोर्ट येणे अजून बाकी आहे- त्यानंतर बॉम्बस्फोटासाठी काही स्थानिकांनीच मदत केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली- यानंतर काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सध्या एटीएसच्या चार टीम चौकशी करत आहेत. यातपुणे पोलिसांची मदत घेण्यात येत आहे- त्यानंतर कालच काही जणांना अटक झाल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.पण पोलिसांकडून मात्र याला दुजोरा मिळालेला नाही

close